रणलाईव्ह फ्युचर ए-आई या नावाचे अॅपमध्ये फसव्या म्हणजेच स्पॉन्जी स्कीममध्ये फसवणूक पाचोरा – भडगांव जळगांव परिसरात या अॅपच्या माध्यमातून १५ ते २० कोटीच्या घरात फसवणूक झाली. आरबीआय च्या नियमानुसार पैशांसंबंधीत ज्या काही योजना असतील त्यांना काही नियम व अटी आहेत.
सदर स्किमची सुरूवात ६०० रूपयांना त्याचा परतावा म्हणून २८ रू. ६० दिवस, त्यानंतर ८ तासाचा परतावा, १ तासाचा परतावा असे आमीष दिले गेले…. त्यानंतर अचानक अॅपमध्ये पैसे येण्याचे बंद झाले आणि कोटी रूपये बुडाले, मार्केटमध्ये बियॉन्ड इनफीनीटी या सारखे अनेक योजना चालु आहेत.
त्यामध्ये ८ हजार ५०० रूपयांना ३० ते ३५ हजार रू. पेंशन आणि १ लाख गुंतवणुकीवर ३६ महिन्यांनंतर १२ लाख रूपयाची चारचाकी गाडी गुंतवणुकीवर
अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या फसवेगीरी ऑफरस् दाखवूण नागरिकांना फसवले जात आहे, तरी नागरिकांनी याची दक्षता घेऊन अशा फसव्या योजनांपासून सावध रहावे…..