अर्थशास्त्रखांन्देशबातमीमहाराष्ट्रराजकारण

भडगाव शेतकरी सहकारी संघ लि. भडगाव या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

एम आय डी सी मध्ये अन्नधान्य व फळप्रक्रिया उद्योग उभारण्याचा मानस... प्रेसिडेंट भैय्यासाहेब पाटील

भडगाव शेतकरी सहकारी संघ लि. भडगाव या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा भडगाव येथे संघाचे मुख्य कार्यालयात शिवसेना शिंदे गटाचे कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.

वेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार संचालक मंडळामार्फत करण्यात आला. कार्यक्रमाचे सुञसंचलन संस्थेचे संचालक गुलाब पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन भैय्यासाहेब पुंडलिक पाटील यांनी केले. ते पुढे म्हणाले कि, शेतकरी सहकारी संघामार्फत भडगाव उपबाजार समितीत धान्य आडत दुकान सुरु करण्यात आले. १४ व्यापार्यांनी नोंदणी केलेली आहे. दसर्यापासुन धान्य खरेदी विक्रीचा शुभारंभ आहे. तसेच शासकीय धान्य खरेदीचे २५ हजार क्किंटलचे उद्दीष्ट होते. सर्व शेतकर्यांचा धान्य माल मोजला गेला याचे संचालक मंडळाला आनंद आहे. साडे सहाशे कोटी रुपये शेतकर्यांच्या बॅंक खात्यावर जमा झालेले आहेत. उर्वरीत शेतकर्यांचे २ कोटी ६४ लाख रुपये बाकी आहेत शासनाकडुन तेही पैसे ८ ते १० दिवसात मिळणार आहेत असेही भैय्यासाहेब पाटील यांनी सांगीतले. तसेच मका खरेदी केंद्र सुरु करण्याबाबतचे पञ जिल्हा मार्केटींग फेडरेशनला दिलेले आहे. तसेच शेतकरी सहकारी संघात व्यापारी संकुल, शेतकरी सदन, मंगल कार्यालय, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुविधा मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. तसेच एम आय डी सी मध्ये शेतकरी सहकारी संघासाठी अन्नधान्य प्रक्रीया व फळ प्रक्रीया उदयोग, प्रशिक्षण संशोधन केंद्र उभारण्यासाठी ५ एकर जागेची मागणी केलेली आहे. यामुळे शेकडो तरुणांना रोजगाराची संधी मिळेल. असेही शेवटी संस्थेचे चेअरमन भैय्यासाहेब पाटील यांनी सांगीतले. 

 

  • तर अध्यक्षीय भाषणातुन कार्यसम्राट आमदार किशोर पाटील म्हणाले कि, सध्या एम आय डी सीची जागा हस्तांतरणाची प्रक्रीया सुरु आहे. शेतकरी सहकारी संघाने एम आय डी सीत प्रकल्प , उदयोग सुरु करण्यासाठी ५ एकर जागेची मागणी केलेली आहे. शासनस्तरावर आपण प्रयत्न करुन संघाला जागा मिळवुन देऊ. अशी ग्वाही आमदार किशोर पाटील यांनी दिली. संघाने प्रकल्प, उदयोग सुरु करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. यामुळे तरुणांना, शेतकर्यांना रोजगार मिळेल.असे सांगत शेतकरी सहकारी संघाच्या चाललेल्या चांगल्या कामकाजाबद्दल सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन आमदार किशोर पाटील यांनी केले. यावेळी सभेस संस्थेचे चेअरमन भैय्यासाहेब पुंडलीक पाटील गुढे, व्हाईस चेअरमन देविदास सहादु माळी वाडे , संचालक जयवंत विक्रम पाटील अंजनविहीरे, राजेंद्र लालचंद परदेशी बांबरुड प्र. ब, खुमानसिंग हिलाल पाटील शिवणी, प्रभाकर शामराव पाटील वलवाडी, अमोल सुरेश पाटील भडगाव, अमोल नाना पाटील भडगाव, जयवंत किसन पाटील वाक, गुलाब हिलाल पाटील कोठली, रायचंद शामसिंग परदेशी घुसर्डी खुर्द, हिरामण सुकदेव पाटोळे पिंप्रीहाट, शुभांगी तुषार पाटील भडगाव, योजना दत्ताञय पाटील भडगाव, भिमराव ओंकार पाटील सल्लागार संचालक घुसर्डी खुर्द, नागेश शिवाजीराव वाघ सल्लागार संचालक भडगाव, गोविंद एकनाथ माळी सल्लागार संचालक गुढे, शांताराम माणिक पाटील सल्लागार संचालक पिंपरखेड, मेहताबसिंग रामसिंग नाईक बॅॅंक प्रतिनिधी भडगाव, गुढे गटाचे माजी जिल्हा परीषद सदस्य विकास पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, बाजार समितीचे संचालक लखीचंद पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील, शहर प्रमुख आबा चौधरी, माजी नगर सेवक सचीन चोरडीया, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप शेंडे, माजी चेअरमन संजय पाटील आमडदे, संस्थेचे सचीव सुरेश पाटील यांचेसह सभासद, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या कर्मचार्यांनी परीश्रम घेतले. उपस्थितांचे आभार संस्थेचे संचालक जयवंत पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »