महाराष्ट्र

दहा हजारांची लाच घेणाऱ्या सरपंचासह पंटर एसीबीच्या जाळ्यात…

दहा हजारांची लाच भोवली....

  • दहा हजारांची लाच घेणाऱ्या सरपंचासह पंटर एसीबीच्या जाळ्यात..

दहा हजारांची लाच भोवली….

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथे

गावातील गाव नमुना आठ अ मध्ये नाव लावण्यासाठी १० हजारांची लाच घेणाऱ्या खडकदेवळा बुद्रुक येथील सरपंचासह पंटरला जळगाव येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.खडकदेवळा बुद्रुक येथील सरपंच अनिल विश्राम पाटील (वय -४६ ) व खाजगी पंटर बलराम हेमराज भील (वय-४६) दोन्ही रा. खडकदेवळा बु ता.पाचोरा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे की तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथील रहिवाशी आहेत.तक्रारदार यांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून तक्रारदार राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नसल्याने त्यांच्या नावावर गाव नमुना आठ अ मध्ये नावे लावण्यासाठी काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याचा मोबदल्यात सरपंच अनिल पाटील यांनी शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी १० हजार रूपयांची लाच मागणी केल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली व पडताळणी करण्यात आली. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास खाजगी पंटराकडे लाच देण्याचे सरपंचांनी सांगितल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली व पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.या दोघांना जळगाव एसीबीने अटक केल्यानंतर ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली आहे.घरांची देखील झाडाझडती घेतल्याने गावात व परिसरात याबाबत चर्चा सुरू आहे.

असे आहे लाच प्रकरण….

40 वर्षीय तक्रारदार हे खडकदेवळा बुद्रुक गावातील रहिवासी आहेत. त्यांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून तक्रारदार राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नसल्याने त्यांच्या नावावर गाव नमुना आठ अ मध्ये नावे लावण्यासाठी काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याचा मोबदल्यात सरपंच अनिल पाटील यांनी शुक्रवार, 27 रोजी दहा हजार रुपयांची लाच मागणी केल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली व पडताळणी करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी खाजगी पंटराकडे लाच देण्याचे सरपंचांनी सांगितल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली व पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी….*

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने तसेच पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, हवालदार रवींद्र घुगे, सुनील वानखेडे, शैला धनगर, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »