फेकरी, दिपनगरसह परिसरात भटक्या श्वानांचा उच्छाद
भटक्या श्वानांकडून नागरिकांसह लहान मुलांना चावा
फेकरी ता.भुसावळ (वार्ताहर)दि.२४. फेकरी, दिपनगरसह निंबोरा बुद्रुक परिसरात गाव श्वानांसह इतरत्र भटक्या श्वानांचा उच्छाद वाढला असून आता ते नागरिकांना व लहान मुलांना चावा घेत गंभीर जखमी करत आहेत. दिपनगर येथील दीप क्रीडांगणात सकाळी फिरण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना व लहान मुलांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. परिसरात अचानक श्वानांची संख्या वाढल्याने व परिसरातील भटक्या श्वानाने चावा घेतलेली एक व्यक्ती दगावल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या श्वानांचा त्रास शाळकरी विद्यार्थ्यांसह नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांनाही होत आहे.
सदर इतरत्र भटकते श्वानांचे दोघं पाय तोडलेले व गंभीर जखमीसह पिसाळलेल्या अवस्थेत त्यांना नागरी वस्तीत मोठ्या संख्येने सोडल्याने महारोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी भटकत्या श्वानांचा बंदोबस्त करावा व परिसरात एवढ्या मोठ्या संख्येने कोण जखमी श्वान सोडत आहे. याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.